स्पर्श..
हळुवार स्पर्शाचा
प्रेमाच्या नजरेचा
उचंबळणाऱ्या भावनांचा
मजभोवतीच्या रुंजीचा
कळत होता परवा पर्यंत
स्पर्श तुझ्या शब्दांचा…
चैतन्यमयी दिवसांचा
आनंदमय रात्रींचा
ह्रदयांच्या स्पंदनांचा
हव्याशा सोबतीचा
कळत होता परवा पर्यंत
स्पर्श तुझ्या शब्दांचा
बदलत्या जाणिवेचा
मदन्मत्त अहंकाराचा
निरर्थक संवादाचा
कळुन न कळल्याचा
जाणवत नाही आज
स्पर्श तुझ्या शब्दांचा
विखारी नजरेचा
जरबेच्या देहबोलीचा
चुकलेल्या बेरजेचा
मांडलेल्या वजाबाकीचा
जाणवत नाही आज
स्पर्श तुझ्या शब्दांचा
“चुकलेल्या बेरजेचा
मांडलेल्या वजाबाकीचा……”. . . .अप्रतिम!!!