अस्तित्व
माहीत होते काटे असतात
तरीही मी गुलाब झाले
माहीत होते जन्म चिखलात
तरीही मी कमळ झाले
माहीत होते अमावस्या असते
तरीही मी पौर्णिमा झाले
माहीत होते डाग असतात
तरीही मी चन्द्र झाले
माहीत होते वारा सुटतो
तरीही मी सुगंध झाले
माहीत होते पाने गळतात
तरीही मी वसंत झाले
माहीत होत दाह सुर्याचा
तरीही मी धरणी झाले
माहीत होता बाण पारध्याचा
तरीही मी हरिणी झाले
माहीत होते प्रेमापायी
जगात मी वेडी ठरले
फक्त तुझ्याच साठी मी
माझे अस्तित्व हरवून गेले
प्रवर्ग: कविता
कविता, भावना, मनातल्या भावना, मराठी
वाह मस्तच खूप दिवसांनी एका चांगली कविता वाचनात आली
प्रतिक्रिये करता धन्यवाद.. 🙂
“माहीत होते प्रेमापायी
जगात मी वेडी ठरले
फक्त तुझ्याच साठी मी
माझे अस्तित्व हरवून गेले”. . . .मस्त…मस्त. . .खूप छान आहे कविता!!!
प्रतिक्रियेकरता आभार.